
- कारल्याच्या रसात केशर वाटून घेतल्यास यकृताचे अनेक विकार बरे होतात. केशर, कापूर मिसळून खाल्ल्यास पोटातील किडे नष्ट होतात.
- थंडीपासून बचाव होण्यासाठी केशर मधात मिसळून घ्यावे.
- चंदन व केशर कडुनिंबाच्या रसात वा मधात उगाळून घेतल्यास मूत्राशयाचे विकार पूर्णतः नष्ट होतात. शरीरातील रक्तशुद्धीसाठी चंदन वा केशर कडुनिंबाच्या रसात वा मधात उगाळून घ्यावे.
- दूध किंवा मधासोबत केशर घेतल्यास त्वचेचा पोत सुधारतो.
- केशराची पेस्ट काळे डाग व मुरूम यावर उपयुक्त ठरते.
- वयोमानानुसार येणारा विसराळूपणा कमी करण्यासाठी केशराची मदत होते.
- ग्लासभर दुधात चिमूटभर केशर आणि मध मिसळून ते प्यावे. केशरात पाणी घालून ते मान, छातीवर लावा. हिवाळ्यात सर्दीपासून आराम मिळतो.
- केशरामध्ये चंदन आणि दूध मिसळून तो फेसपॅक वीस मिनिटे चेहर्यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुकून टाका. आठवड्यातून दोनदा लावल्यास रंग उजळेल.
- रोज केशराचे दूध प्यायल्यास रंग उजळतोच, परंतु नैराश्याची समस्याही दूर होते.




























































