आता राज्य संघटनांना मिळणार जादा तिकिटे;बीसीसीआयच्या अर्ध्या तिकिटांना मिळाली कात्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तिकिटे वाटपाच्या मुद्दय़ावरून मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने हिंदुस्थान व वेस्ट इंडीज वन डे सामन्याच्या आयोजनातून माघार घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीने शनिवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेत बीसीसीआयला मिळणाऱ्या अर्ध्या तिकिटांवर कात्री मारली आहे. त्यामुळे आता त्यांना प्रत्येक सामन्याला 1200 ऐवजी 604 तिकिटे मिळणार आहेत. उर्वरित तिकिटे सामन्याचे आयोजन करणाऱ्या राज्य संघटनेला देण्यात येणार आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने माघार घेतल्यानंतर कोलकाता व तामीळनाडू या संघटनांनीही सामन्याच्या आयोजनाबाबत साशंकता दाखवली होती.

  • नव्या घटनेनुसार 90 टक्के तिकिटे सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करण्यात यावी.
  • प्रशासकीय समितीच्या निर्णयानंतर आता बीसीसीआयला 1200 ऐवजी 604 तिकिटे मिळतील.
  • आता 604 तिकिटांमध्येच बीसीसीआयला स्पॉन्सर्स व ब्रॉडकास्टर्सची सोय करावी लागणार आहे.