
कोरोना काळात असो किंवा आताही, ऑनलाइन मीटिंगसाठी गुगल मीटचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. युजर्सच्या सुविधेसाठी गुगलने मीट ऍपमध्ये एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून युझर्सना यूटय़ूबवर मीटिंग लाइव्ह स्ट्रीम करता येणार आहे.
ऍडमिन मीट ऍपवरच्या एखाद्या विशिष्ट मीटिंगच्या ऍक्टिव्हिटी पॅनेलवर जाऊन लाइव्ह स्ट्रीमिंगचा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. तसंच त्याला लाइव्ह स्ट्रीम करू शकणाऱया मीटिंग चॅनेलचीही निवड करता येणार आहे. युझर्सना एखादी विशिष्ट माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर लाइव्ह स्ट्रीमिंग हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. तसेच या फीचरमध्ये पॉज आणि पुन्हा प्ले करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय या फीचरच्या माध्यमातून मीटिंगनंतर युझर्सना प्रेझेंटेशन्सदेखील पाहता येईल.




























































