
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील एकूणच तणावाची स्थिती पाहता देशभरातील 32 विमानतळांवर विमानसेवा बंद करण्यात आलेल्या होत्या. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात 26 हून अधिक पर्यटक मारले गेले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीची घोषणा झाली. त्यामुळेच आता देशभरातील बंद असलेल्या विमानतळांना देखील हिरवा कंदील मिळाला आहे.
देशभरातील तब्बल 32 विमानतळांवर नागरी विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे लाखो प्रवासी खोळंबले होते. तसेच इतर ठिकाणांहून येणारी विमानेही लांबली होती. 15 मे 2025 रोजी सकाळी 5:29 वाजेपर्यंत नागरी विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली होती. परंतु आता ही सर्व 32 विमानतळं तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती विमानतळ प्राधीकरण यांच्याकडून देण्यात आली आहे. याकरता प्रवाशांनी
प्रवाशांनी एअरलाइन्सशी थेट संपर्क साधून विमानांची सद्यस्थिती जाणून घ्यावी. तसेच इतर अधिक माहितीसाठी एअरलाइन्सच्या वेबसाईटवर संपर्क साधावा अशी माहिती विमानतळ प्राधीकरणाकडून देण्यात येत आहे.
खालील विमानतळांवर विमानसेवा ही बंद करण्यात आली होती.
चंदीगड, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, भुंतर, किशनगड, पाटियाला, शिमला, कांगडा-गग्गल, बठिंडा, जैसलमेर, जोधपूर, बीकानेर, हलवारा, पठानकोट, जम्मू, लेह, मुंद्रा, जामनगर, हीरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज, हिंडन, शिमला