‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला काम मिळत नसल्याने पत्नी घेतेय घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार वर्षांपासून एकही चित्रपट न मिळाल्याने अभिनेता इम्रान खान सध्या बेरोजगार झाला आहे. चित्रपट मिळत नसल्याने इमरानची कमाई बंद झाली असून त्यामुळे त्याची पत्नी अवंतिकाने त्याच्याशी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे.

इम्रान व अवंतिका यांचे 2011 साली लग्न झाले होते. लग्नाआधी देखील ते तब्बल सहा ते सात वर्ष एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या आधी इम्रानचा ‘जान तु या जाने ना’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यावेळी तो बॉलिवूडमध्ये यशस्वी होईल असे वाटले होते. मात्र इम्रानच्या वाट्याला फारसे यश आले नाही. चार वर्षांपूर्वी आलेला त्याचा कट्टीबट्टी सिनेमाही बॉक्स ऑफिसवर आपटला होता. त्यानंतर त्याला एकही सिनेमा मिळालेला नाही. इम्रानने नंतर दिग्दर्शक होण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा तो प्रयत्नही अयशस्वी ठरला.

चार वर्षांपासून एकही चित्रपट न मिळाल्याने इम्रानकडील जमापूंजी सध्या संपत चालली आहे. त्यामुळे त्याच्यात व अवंतिकामध्ये वाद होत आहेत. सततच्या वादाला कंटाळून अवंतिकाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. सध्या अवंतिका व या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी इमारा ही अवंतिकाच्या माहेरी राहत आहेत.