मायदेशी परतताना इम्रान यांचं विमानातील बिघाडलं, झाले बेहाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
imran khan

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अमेरिकेतील दौरा आटोपून मायदेशी परतताना चांगलेच हाल झाले. सौदी अरेबियाने पुरवलेल्या विशेष विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते विमान मागे परतले. नंतर त्यांना जेद्दाहचा वळसा घालून पाकिस्तानला जावे लागले.

पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे सौदी अरेबियाने इम्रान यांच्यावर मेहेरबानी केली व त्यांना मायदेशी जाण्यासाठी विशेष विमान पुरवले. या विमानाने शनिवारी दुपारी न्यूयॉर्कच्या जॉन एफ कॅनडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतले होते. काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यावर त्याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान पुन्हा जॉन एफ कॅनडी विमानतळावर उतरवले. बिघाड वेळीच दूर न झाल्याने इम्रान हे सौदी एअरलाईन्सने जेद्दाह पोहोचले. तेथेही त्यांना काही वेळ थांबायला लागले. त्यानंतर दुसऱया विमानाने पाकिस्तानचा मार्ग धरावा लागला.

अल्लाला खूश करायला ‘जिहाद’ करू!

अमेरिकेहून मायदेशी परतताच इम्रान खान यांनी कश्मिरींवरील प्रेमाचा पुन्हा दिखावा केला. जगाने साथ दिली नाही तरी चालेल, आम्ही मात्र कश्मिरींसोबत कायम राहू. कश्मिरींसोबत उभे राहणे म्हणजे ’जिहाद’ आहे. अल्लाह आमच्यावर खूश व्हावा, यासाठी आम्ही हे करतोय, असे सांगून तुम्ही साथ द्या, मग कश्मिरी जिंकतील, असे आवाहन त्यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना केले.