इम्रान खान व त्यांच्या पत्नीला 17 वर्षांची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना विशेष न्यायालयाने 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इम्रान यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पंतप्रधान असताना इम्रान खान व त्यांच्या पत्नीने सरकारी खजिन्यावर डल्ला मारल्याचा आरोप आहे. मे 2021 मध्ये इम्रान खान यांना सौदीच्या राजकुमारांकडून महागडे घडय़ाळ, हिरे आणि सोन्याचे दागिने भेट म्हणून देण्यात आले होते. पंतप्रधान या नात्याने मिळालेल्या भेटी सरकारी खजिन्यात जमा केल्या जातात, मात्र इम्रान खान व त्यांच्या पत्नीने हे घडय़ाळ व दागिने परस्पर विकले. त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात खटला सुरू होता.