प्रत्येक अडचणीत सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी – आमदार डॉ. पाटील

परभणीचा आमदार म्हणून गेल्या पाच वर्षाच्या काळात परभणीला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी कोटयावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. सार्वजनिक विकासा सोबतच प्रत्येक सामान्य नागरिकांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी तत्पर राहून परभणीतील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.

परभणी शहरातील वसमत रोडवरील कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात आज ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, संजय गाडगे, तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, संदीप झाडे, जि. प. सदस्य गजानन देशमुख, दिनेश बोबडे, रवींद्र पतंगे, मनपा गटनेते चंदू शिंदे, मनपा सदस्य प्रशांत ठाकूर, सुशील कांबळे, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, पंचायत समिती गटनेते गोपीनाथराव झाडे, त्र्यंबक भरोसे, डॉ. प्रमोद देशमुख, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, सोपानराव अवचार, तानाजी भोसले, फैजुल्ला पठाण, दलीत आघाडी तालुकाप्रमुख सुभाष जोंधळे, शहरप्रमुख अमोल गायकवाड, शरद हिवाळे, डॉ. ज्ञानेश्वर गीरी आदीची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार डॉ. पाटील म्हणाले, आपणा सर्वांच्या आशिर्वादाने व साक्षीने या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने गुरूवार, ३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शनिवार बाजार येथून सकाळी दहा वाजता महारॅलीस प्रारंभ होणार असून अष्टभुजादेवी मातेचे दर्शन घेवून पुढे शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शिवसेना, युवा सेनेच्या कार्यकत्र्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

या मेळाव्यात रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा लोकनेते विजय वाकोडे यांचे सूपूत्र आशिष वाकोडे यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माधव गायकवाड यांनी आमदार डॉ. पाटील यांना चर्मकार महासंघाचा पाठिंबा जाहीर केला. यात कार्यक्रमात तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सहसंपर्कप्रमुख डॉ. नावंदर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन अभय कुलकर्णी तर दिनेश बोबडे यांनी आभार मानले. या मेळाव्यास यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी सरपंच, पदाधिकारी, युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या