
शिवसेनेच्या प्रयत्नातून वरळी सागरी सेतूच्या बाजूस ‘ऐतिहासिक वरळी’ नामफलक तसेच जे. के. कपूर चौक येथे कोळीशिल्प बसवण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरळी सागरी कोळी महोत्सव समिती अध्यक्ष व युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे वरळी सागरी सेतूच्या बाजूस ऐतिहासिक वरळी नामफलक तसेच जे. के. कपूर चौक येथे कोळीशिल्प बसवण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आमदार सुनील शिंदे व विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी, जीवबा केसरकर, शाखा समन्वयक रुणाल लाड, संतोष जाधव, सत्यम नायर, उपविभाग संघटक ज्योती दळवी, शाखा संघटक अनिता नायर, युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील, युवती कार्यकारिणी सदस्य अश्विनी पवार, सहसचिव राजवी लाड, शाखा अधिकारी रूपाली लष्करे, शाखा समन्वयक सचिन साळवे, रुपेश घाग, शैलेश सिंग, सुशील वर्मा उपस्थित होते.































































