आयकर विभागाचे पॅन 2.0 प्रोजेक्ट येतेय

आयकर विभाग 1435 कोटी रुपये खर्चून पॅन 2.0 प्रोजेक्ट लाँच करणार आहे. पॅन 2.0 नेमकं आहे तरी काय? आपल्या सध्याच्या पॅनकार्डचे काय होणार, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

नवीन यंत्रणा पॅन 2.0 अंतर्गत सुरू करण्यात आलेले युनिफाईड पोर्टल एकाच वेबसाईटवर पॅन आणि टॅनशी संबंधित सेवा प्रदान करेल. उदाहरणार्थ पॅन बनवणे, माहिती अपडेट करणे, आधार-पॅन लिंकिंग, दुसऱ्यांदा पॅन काढणे, ऑनलाईन पॅन व्हेरिफिकेशन आदी सर्व बाबी एका ठिकाणी होतील. यामुळे युजर्सचा अनुभव सुधारेल. शिवाय तक्रारींचे जलद निराकरण होईल. प्रक्रिया कागदविरहित असल्याने पारदर्शकता आणि ट्रकिंगला सोपे जाईल.

जुन्या पॅनधारकांना पॅन 2.0 अंतर्गत नवीन पॅनकार्ड काढायची आवश्यकता नाही. जुने पॅनकार्ड पूर्णपणे वैध असेल. देशात 81.24 कोटी पॅनकार्डधारक आहेत आणि 73 लाखांपेक्षा जास्त टॅनकार्डधारक आहेत.