
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱयांना सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे 42 टक्के दराने महागाई भत्ता देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी सोमवारपासून आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे ऐन गणपतीत एसटीची वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या सरकारी कर्मचाऱयांनी 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून एसटी कर्मचाऱयांना केवळ 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. त्यामध्ये सरकारने नुकतीच चार टक्क्यांची वाढ केली होती. तरीही कर्मचाऱयांनी वाढीव महागाई भत्त्याबरोबरच वाढीव वेतन आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱयांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून वाढीव महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. इतरही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने संघटनेने बेमुदत उपोषण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.




























































