#INDvSA टी-20 लढतीवर पावसाचे सावट, सामन्यापूर्वी कोसळल्या धुंवाधार सरी

426


दक्षिण आफ्रिकेचा हिंदुस्थान दौरा रविवारपासून सुरू होत आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना धर्मशालामध्ये रंगणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावत असून सामन्यापूर्वी धुव्वाधार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हा सामना होणार की नाही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे क्रीडाप्रेमींची चिंता वाढली आहे.

… म्हणून कुलदीप आणि चहल टी- 20 संघात नाही – विराट कोहली

टी-20 सामना सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. सामन्यापूर्वी पाऊस झाला असला तरी धर्मशाला मैदानाची ड्रेनेज सिस्टिम उत्तम आहे. पाऊस लवकर थांबल्यास सामना पूर्ण 40 षटकांचा होऊ शकेल. पावसाचा जोर असाच सुरू राहिला आणि मैदान सुकण्यास वेळ लागल्यास सामन्यातील काही षटकं कमी केली जाण्याची शक्यता आहे. षटकं कमी झाली तरी चालेला मात्र सामना रद्द व्हायला नको अशी प्रतिक्रिया क्रीडाप्रेमींनी दिली आहे.

अनुराग ठाकूर यांनी शेअर केला व्हिडीओ
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकरू यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धर्मशाला मैदानाचा एक छोटासा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मैदानावर कव्हर्स दिसून येत असून पाऊसही सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागानेही धर्मशालामध्ये दिवसभर पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या