‘टीम डंडिया’ला इतिहास घडविण्याची संधी

363

विजयी रथावर स्वार असलेल्या विराट कोहलीच्या सेनेला पुण्यात 10 ऑक्टोबरला सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून इतिहास घडविण्याची संधी असेल. कारण क्रिकेटच्या इतिहासात अद्यापि कोणत्याही संघाने सलग 11 कसोटी मालिका जिंकलेल्या नाहीत. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांनी 10-10 कसोटी मालिका जिंकलेल्या आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानला आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकण्याची ‘टीम इंडिया’ला संधी असेल. दुसरीकडे दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानावर उतरेल, मात्र कसोटीवर पावसाचे सावट असल्याने  ‘टीम इंडिया’च्या आशेवर पाणी फेरले जाऊ शकते.

गहुंजे स्टेडियमवर

दुसरा कसोटी सामना

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर दुसऱयांदा कसोटी सामना सामना होत आहे. या मैदानावरील पहिला कसोटी सामना हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान 23 फेबुवारी 2017 साली झाला होता. तीन दिवसांच्या आत संपलेल्या या लढतीत हिंदुस्थानला 333 धावांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती. त्यावेळी हिंदुस्थानचा पहिला डाव 105, तर दुसरा डाव 107 धावांवर गारद झाला होता. पुण्याच्या या खेळपट्टीवर तेव्हा खूप टीका झाली होती. क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली बनविण्यात आलेल्या या खेळपट्टीची प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी पाहणी केली.

पावसाच्या सावटाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात मंगळवारी आणि बुधवारी पावसाने हजेरी लावली. शिवाय पुढील दोन दिवसही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाच्या सावटाची शक्यता आहे. पावसाने काही खेळ वाया गेल्यास त्याचा फायदा कोणत्या संघाला होणार हे सांगणे कठीण आहे. किंवा पावसामुळे ही कसोटी अनिर्णितही राहू शकते.

हेड टू हेड

हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिकादरम्यान आतापर्यंत 37 कसोटी सामने झाले आहेत. यात 12 कसोटी हिंदुस्थानने, तर 15 कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकल्या असून 10 लढती ड्रॉ झाल्या आहेत. हिंदुस्थानमध्ये उभय संघांमध्ये 17 कसोटी झाल्या असून हिंदुस्थानने 9, दक्षिण आफ्रिकेने 5 लढती जिंकल्या, तर 3 ड्रॉ झाल्या आहेत.

रोहितला मुक्तपणे खेळू द्या – कोहली

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला यशस्वी पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माच्या फलंदाजीवर ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळली. मात्र  रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये मुक्तपणे फलंदाजी करू द्या. त्याच्या कसोटी कारकीर्दीच्या भविष्याबद्दल एवढय़ात चर्चा करण्यात अर्थ नाही, असे परखड मत कोहलीने व्यक्त केले.

‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणपद्धती मला फारशी आवडलेली नाही. परदेशातील विजयासाठी दुप्पट गुण द्यायला हवेत. पहिल्या सत्रानंतर असा बदल झाला तर मला नक्कीच आनंदच होईल. या अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा दर्जा सुधारला आहे, असे कर्णधार विराट कोहली म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या