#INDvSA विराट-रोहितमध्ये ‘झुंज’, वर्ल्ड रेकॉर्डवर नजर

714

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेतील अंतिम टी-20 सामना बंगळुरूमध्ये रविवारी होणार आहे. एम. चिन्नास्वामी मैदानावर होणाऱ्या या लढतीत टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानात उतरणार. याच दरम्यान सर्वांची नजर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावरही असणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांसाठी या दोघांमध्ये चढाओढ लागली आहे.

आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 लढतीत विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी केली. या खेळीसह विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आणि रोहित शर्माला मागे सोडले. दुसऱ्या लढतीत रोहितने फक्त 12 धावा केल्या आणि याचा फायदा विराटला झाला.

सध्या विराट कोहलीच्या नावावर 71 टी-20 लढतीत 2441 धावांची नोंद आहे, तर रोहितच्या नावावर 97 लढतीत 2434 धावांची नोंद आहे. दोघांमध्ये फक्त 8 धावांचा फरक आहे. तिसऱ्या लढतीत या दोघांमध्ये धावांची झुंज पाहायला मिळणार आहे. रोहित सलामीला आणि विराट मध्यक्रमात उतरणार असल्याने दोघांनाही चांगली संधी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या