Ind Vs Aus – पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडिया दणदणीत विजय, टी. नटराजन चमकला

पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला आहे. नवोदित गोलंदाज टी नटराजन व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा सलामीवीर अवघी एक धाव करून परतला तर कर्णधार विराट कोहली देखील अवघ्या 9 धावांवर बाद झाला. मात्र  सलामीवीर लोकेश राहुलने फटकेबाजी करत ठोकलेले अर्धशतक व जाडेजाच्या 44 धावांच्या आधारे टीम इंड़ियाने 20षटकात 162 धावा केल्या.

टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. 50 धावांचा टप्पा ओलांडला तरी एकही खेळाडू बाद झाला नव्हता. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर चहल व नटराजन यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी तीन तीन खेळाडू बाद केले. या दोन्ही गोलंदाजांच्या दणक्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला.

आपली प्रतिक्रिया द्या