रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम, धोनी-पॉन्टिंगला जे जमलं नाही ते ‘करून दाखवलं’

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा ओढत आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात (वन डे, कसोटी आणि टी-20) सातत्याने धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराटला ‘रनमशीन’ या नावाने ओळखले जाते. रविवारी बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात वेगवान 5 हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर जमा झाला आहे.

द्विशतकांचा ‘बादशहा’ रोहितचा पराक्रम; एकाच डावात तेंडुलकर-गांगुलीचा विक्रम मोडला

विराट कोहली याने बंगळुरूतील खेळीदरम्यान कर्णधार म्हणून 5 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने 82 व्या डावात या कामगिरीची नोंद केली. विराटने महेंद्रसिंह धोनी रिकी पॉन्टिंगसारख्या खेळाडूंना पछाडत ही कामगिरी नोंदवली. एक दिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात वेगवान 5 हजार धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. एक ऑस्ट्रेलियाचा, तर एक दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे.

वन डे मध्ये सर्वात वेगवान 5 हजार धावा करणारे कर्णधार –

विराट कोहली (हिंदुस्थान) – 82 डाव
महेंद्रसिंह धोनी (हिंदुस्थान) – 127 डाव
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 131 डाव
ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – 135 डाव
सौरव गांगुली (हिंदुस्थान) – 136 डाव

आपली प्रतिक्रिया द्या