हिंदुस्थान-इंग्लंड क्रिकेटच्या पंढरीत भिडणार, दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉटिंगहॅम येथील पहिल्या कसोटीत हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली. अखेरच्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि कसोटी ड्रॉ राहिली. आता यजमान इंग्लंड संघ व पाहुणा हिंदुस्थानी संघ उद्यापासून लॉर्ड्स या क्रिकेटच्या पंढरीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या कसोटीत विजय मिळवून पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील. उभय देशांमधील ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येत आहे.

पुजारा, कोहली, रहाणेकडून अपेक्षा

हिंदुस्थानी संघाला उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीत फलंदाजांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांना मागील काही कसोटींत छोटय़ा खेळींचे मोठय़ा खेळींत रूपांतर करता आलेले नाही. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला मेलबर्न कसोटीतील शतक वगळता आपला ठसा उमटकता आलेला नाही. त्यामुळे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना उर्वरीत मालिकेत आपली धमक दाखवावीच लागणार आहे.

यजमान संघांतही बदल निश्चित

यजमान इंग्लंडच्या संघातही दुसऱ्या कसोटीसाठी बदल होणार हे निश्चित आहे. स्टुअर्ट ब्रॉडला दुखापत झाली असून तो या कसोटी मालिकेला   मुकणार आहे.  जेम्स ऍण्डरसनला ही दुखापत झाली आहे. खेळपट्टीवर गवत ठेवल्यास वेगवान गोलंदाज मार्क वूडला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात येऊ शकते. लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीत चौथ्या व पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी बनवल्यास मोईन अलीलाही संघात चान्स मिळू शकतो. शिवाय रोरी बर्न्सऐकजी हसीब हमीदला पसंती देण्यात येऊ शकते.

मयांक फिट पण…

सलामीवीर मयांक अग्रवालला पहिल्या कसोटीआधी दुखापतीला सामोरे जावे लागले. आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. पण त्याला कोणत्या स्थानाकर खेळवायचे हा प्रश्न हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनसमोर असणार आहे. लोकेश राहुलला पहिल्या कसोटीत संधी दिली. त्याने या संधीचे सोने केले. त्यामुळे तो रोहीत शर्मासोबत सलामीला खेळेल हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत मयांक अग्रवालला मधल्या फळीत खेळवू शकतात. पण चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हे खेळाडू फॉर्ममध्ये नसले तरी त्यांना दुखापत झाल्याशिवाय संघामधून कगळण्यात येऊ शकत नाही.

शार्दूलच्या दुखापतीमुळे कॉम्बिनेशनमध्ये बदल

मुंबईकर अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला बुधवारी दुखापत झालीय. यामुळे दुसऱ्या कसोटीत तो खेळु शकणार नाही. शार्दूल ठाकूरच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्येही बदल होणार हे पक्के आहे. हिंदुस्थानी संघ दुसऱ्या कसोटीत कोणत्या गोलंदाजी कॉम्बिनेशनने मैदानात उतरतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांसोबत इशांत शर्माला अंतिम संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच रवींद्र जाडेजासह रविचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजाला अंतिम अकरामध्ये चान्स देण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन फिरकी गोलंदाज खेळवल्यास तीन वेगवान गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये निकडण्यात येईल अन्यथा चार वेगवान गोलंदाजांसह एक फिरकी गोलंदाज टीम इंडियात असेल.

संभाव्य उभय संघ खालीलप्रमाणे

हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, चेतेश्वर पुजारा,  मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा किहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादक, लोकेश राहुल, रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड – जो रूट (कर्णधार), जेम्स ऍण्डरसन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्राऊली, सॅम करण, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिनसन, डॉम सिबले, मार्क वूड, साकीब महमूद.