
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामना सुरू आहे. सामन्या चौथा दिवस सुरू असून दुसऱ्या डावात इंग्लंडचा अर्धा संघ टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तंबूत धाडला आहे. टीम इंडियाच्या सर्वच गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी केल्यामुळे इंग्लंडचे फलंदाज फार काही कमाल करू शकले नाहीत. मात्र याच दरम्यान मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंडूंवर खेळत असताना बेन स्टॉक्स दुखापत होताहोता वाचला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावा केल्या आहेत. तसेच टीम इंडियाने सुद्धा आपल्या पहिल्या डावात 387 धावाच केल्या आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत जास्तीत जास्त धावांच आव्हान टीम इंडियापुढे उभं करण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरले. परंतु त्याचा मनसुबा गोलंदाजांनी उधळून लावला आहे. वॉशिंग्टन सुंदर (3 विकेट), मोहम्मद सिराज (2 विकेट) आणि नितिश कुमार रेड्डी आणि आकाश दीप यांनी आतापर्यंत प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 181 धावांवर सात विकेट अशी झाली आहे. याच दरम्यान गोलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजच्या चेंडूंवर बेन स्टोक्सची चांगलीच तारांबळ उडालेली पहायला मिळाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
Not where you want to be hit 😅 pic.twitter.com/mvW3uXfMcp
— England Cricket (@englandcricket) July 13, 2025