IND Vs ENG 5th Test – असं झालं तर टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित! मालिका अनिर्णित सुटणार?

ओव्हलमध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने चांगली पकड निर्माण केली आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 224 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची वादळी सुरूवात केली होती. परंतु त्यांच्या वादळाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ब्रेक लावला आणि इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून आतापर्यंत 259 धावांची आघाडी घेतली आहे.

ओव्हल मैदानाचा विचार केला तर, या मैदानावर 263 हून अधिका धावांच्या आव्हानाचा कोणत्याच संघाला पाठलाग करता आलेला नाही. 1902 साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 263 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता. त्यानंतर 1963 साली वेस्ट इंडिजने 253 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. मात्र त्यानंतर कोणत्याच संघाला 250 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात या मैदानावर यश आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाने जर 300 हून अधिक धावांच आव्हान दिलं तर, टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील. सध्या टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 278 धावा करत 259 धावांची आघाडी घेतली आहे. रविंद्र जडेजा (24*) आणि ध्रुव जुरेल (05*) खेळत आहेत.

IND Vs ENG 5th Test – गोलंदाजीने नाही तर पठ्ठ्याने फलंदाजीने केलीये कमाल, आकाश दीपने इंग्लंडची शाळा घेतली