INDvsENG – इंग्लंडचा दारुण पराभव, टीम इंडियाची मालिकेत 2-1 अशी आघाडी

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात झालेल्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंड संघाचा 10 गडी राखून दारुण पराभव केला आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपला पहिला डाव 3 बाद 99 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र अवघ्या 46 धावांमध्ये टीम इंडियाने 7 विकेट्स गमावल्या. हिंदुस्थानला पहिल्या डावात 33 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव टीम  इंडियाने 91 धावांमध्ये गुंडाळला आणि 49 धावांचे माफक आव्हान एकही गडी न गमावता पार केले.

 • कसोटी मालिकेत टिम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
 • तिसऱ्या कसोटी सामन्यात टिम इंडियाने 10 गडी राखून इंग्लंडला पराभूत केले आहे

 • हिंदुस्थानपुढे विजयासाठी 49 धावांचे आव्हान
 • अश्विनने 5, अक्षर पटेलने 4 आणि वाशिंग्टन सुंदरने 1 बळी घेतला
 • इंग्लंडचा डाव 81 धावांमध्ये आटोपला
 • इंग्लंडला नववा धक्का, लिच 9 धावांवर बाद
 • इंग्लंडचा आठवा धक्का, फोक्स 8 धावांवर बाद
 • आर. अश्विनचे कसोटी कारकीर्दीत 400 बळी पूर्ण
 • इंग्लंडला सातवा धक्का, आर्चर शून्यावर माघारी
 • इंग्लंडचा सहावा धक्का, पोप 12 धावांवर बाद
 • इंग्लंडचा निम्मा संघ माघारी, कर्णधार रूट 19 धावांवर बाद
 • इंग्लंडचा चौथा धक्का, स्टोक्स 25 धावांवर बाद
 • इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
 • सिबलीला केले 7 धावांवर बाद
 • अक्षर पटेल जोमात, इंग्लंडला दिला तिसरा धक्का
 • इंग्लंडचा दुसरा धक्का, बेअरस्टो शून्यावर माघारी
 • क्राउली शून्यावर बाद

 • इंग्लंडचा दुसरा डाव सुरू
 • रुटने 5 बळी, तर लिचने 3 बळी घेतले
 • अवघ्या 46 धावांमध्ये गमावल्या 7 विकेट्स
 • हिंदुस्थानकडे 33 धावांची नाममात्र आघाडी
 • हिंदुस्थानचा संपूर्ण संघ 145 धावांमध्ये गारद
 • हिंदुस्थानला नववा धक्का, अश्विन 17 धावांवर बाद
 • लिच आणि रुटच्या फिरकीत टीम इंडिया अडकली
 • अक्षर पटेलही शून्यावर माघारी

 • वाशिंग्टन सुंदर शून्यावर माघारी
 • रिषभ पंतही 1 धावांवर बाद

संघातून डच्चू मिळताच पृथ्वीचा ‘डबल धमाका’, विक्रमांचा पाडला पाऊस

 • रोहित शर्मा 66 धावांवर बाद
 • टीम इंडियाला चौथा धक्का, रहाणे 7 धावांवर बाद
आपली प्रतिक्रिया द्या