
टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विन (Ravichandran Ashwin) याने अहमदाबाद कसोटीत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने 400 बळींचा टप्पा गाठला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात खेळताना इंग्लंडने या कामगिरीची नोंद केली.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अश्विन कसोटी क्रिकेटमधील मैलाचा दगड पार केला. जोफ्रा आर्चर हा अश्विनचा 400 वा बळी ठरला आहे. यासह त्याने अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
What a champion bowler
4️⃣0️⃣0️⃣ Test wickets for @ashwinravi99 and we’re sure there’s still many more to come
Fastest Indian to achieve this milestone @Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/QyvRUr9e4Y
— BCCI (@BCCI) February 25, 2021
सर्वात वेगवान 400 बळी
टीम इंडियाकडून सर्वात वेगवान 400 बळी मिळवणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला आहे. अश्विनने 77 व्या कसोटीमध्ये हा कारनामा नोंदवला आहे. अनिल कुंबळेने 85, हरभजनने 96 कसोटीत 400 बळींची नोंद केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याच्या नावार असून त्याने 72 कसोटीत ही कामगिरी केली होती. अश्विन या यादीत आता दुसऱ्या स्थानावर आला असून त्याने रिचर्ड हेडली, डेल स्टेन, रंगना हेराथ या दिग्गजांना मागे टाकले आहे.
भज्जीचा विक्रम मोडण्याची संधी
दरम्यान, टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी अनिल कुंबळेने घेतले आहे. कुंबळेच्या नावावर 619 बळींची नोंद आहे, तर हरभजन सिंग याच्या नावावर 417 बळींची नोंद आहे. आगामी काळात अश्विनकडे भज्जीचा विक्रम मोडण्याची नामी संधी आहे.




























































