इशांत शर्माकडे कपिलदेव यांच्या पंक्तीत बसण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टीम इंडिया’चा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन महत्त्वाच्या उपलब्धी मिळवण्याची संधी असेल. हिंदुस्थानचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्यानंतर शंभर कसोटी सामने खेळणारा दुसरा हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज ठरण्यापासून केवळ तीन कसोटी दूर आहे. याचबरोबर 300 कसोटी बळी टिपणारा ‘टीम इंडिया’चा तिसरा वेगवान गोलंदाज ठरण्यासाठी इशांतला केवळ तीन बळींची गरज आहे.

97 कसोटींमध्ये 297 बळी

इशांत शर्माने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 97 कसोटी सामने खेळले असून 32.39 च्या सरासरीने 297 बळीही टिपले आहेत. इशांतने एका डावात 11 वेळा 5 गडी बाद केले आहेत. याचबरोबर एका कसोटीत त्याने एकदा 10 बळीही टिपले आहेत.