IND Vs ENG Test Series – हा फक्त एक योगायोग… जसप्रीत बुमराला ट्रोल करणाऱ्यांना सचिन तेंडुलकरच तोडीस तोड उत्तर

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच अ‍ॅण्डरसन-तेंडुलकर मालिका पार पाडली. ही पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. ओव्हल कसोटीमध्ये दोन्ही संघांनी विजयश्री खेचून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. अखेर मोहम्मद सिराजने आपला जलवा दाखवला आणि सामना खेचून आणला. त्यामुळे मालिका अनिर्णिती सुटली. टीम इंडियाने दोन सामने या मालिकेत जिंकले आणि या दोन्ही सामन्यांमध्ये जसप्रीत बुमरा नव्हता. त्यामुळे जसप्रीत बुमराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराच्या बाजूने आता सचिन तेंडुलकर मैदानात उतरला असून त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

टीम इंडियाने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये जसप्रीत बुमरा खेळला नव्हता. यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. जसप्रीत बुमराची बाजू आता खुद्द सचिन तेंडुलकरने घेतली आहे. Reddit वर बोलत असताना तो म्हणाला की, “ज्या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमरा खेळला नाही, ते सामने टीम इंडियाने जिंकणं हा फक्त एक योगायोग आहे. मला माहितीये की लोकं वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. खर सांगायचं झालं तर माझ्यासाठी हा फक्त एक योगायोग आहे बाकी काही नाही. जसप्रीतने मालिकेची चांगली सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या सामन्यात तो खेळला नाही, परंतु तिसऱ्या सामन्यात खेळताना त्याने चांगली गोलंदाजी केली. चौथ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा पाच विकेट घेतल्या. त्यामुळे सध्याच्या घडीला जगात त्याच्यासारखा कोणताच गोलंदाजी नाही.” असं म्हणत सचिनने जसप्रीतची बाजू घेतली असून ट्रोल करणाऱ्यांना तोडीस तोड उत्तर दिलं आहे.

मैदानात कोल्हा आला आणि सामना थांबला, थेट क्रिकेटच्या पंढरीला घातली प्रदक्षिणा! पाहा Video

“जसप्रीत बुमराच प्रदर्शन जबरदस्त राहिलं आहे. आतापर्यंत त्याने जो काही खेळ केला आहे, तो अविश्वसनीय आहे. माझ्या मते, तो नि:संशयपणे या काळातील सर्वात सातत्यपूर्ण खेळ खेळणारा खेळाडू आहे. मी त्याला इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा चांगला खेळाडू मानतो.” असं सचिन तेंडुलकर म्हणाला आहे. जसप्रीत बुमराने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने खेळले आणि तीन सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. तसेच एकाच डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम सुद्धा त्याने केला आहे.