
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत दमदार खेळाचे प्रदर्शन केले आणि कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला पूर्ण कला. टीम इंडियाने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळ केला आणि 9 विकेटने सामना एकहाती जिंकला. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली या तिघांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं. सामन्यासह मालिका टीम इंडिया जिंकली मात्र, एका चुकीमुळे ICC ने टीम इंडियावर कारवाई करत सामना शुल्काच्या 10 टक्के इतक दंड ठोठावला आहे.
रोहित, विराटला मोकळीक द्यायलाच हवी! संजय बांगर यांचे परखड मत
ICC आचार संहिता 2.22 नुसार टीम इंडियावर कारवाई करण्यात आली आहे. टीम इंडियावर निर्धारीत वेळेत दोन षटके कमी टाकल्याचा ठपका ठेवण्यात आला. कर्णधार केएल राहुलने सुद्धा आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना सामना शुल्काच्या 10 टक्के इतका दंड भरावा लागणार आहे. ICC च्या आचार संहितेनुसार, जर संघाने निर्धारित वेळेत षटके टाकली नाहीत तर संघातील प्रत्येक खेळाडूला प्रती षटके 5 टक्के दंड ठोठावला जातो. टीम इंडियाने दोन षटके कमी टाकल्यामुळे त्यांच्यावर 10 टक्के इतका दंड आकारण्यात आला आहे.

























































