IND Vs SL – देवदत्त पडिक्कलच दमदार शतक, यशस्वीसह पंत-जुरेल स्वस्तात बाद; श्रीलंका 11 संघाने टीम इंडियाला झुंजवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि श्रीलंका इलेव्हन या संघांमध्ये सध्या तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात यशस्वी जसवाल, ऋषभ पंत यांनी निराश केलं, पण देवदत्त पडिक्कलने दमदार कागमगिरी करत शतक ठोकलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर येत त्याने संघाचा डाव सावरला आणि 14 चौकार आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर 121 चेंडूंमध्ये 103 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

सामन्याच्या पहिल्या दिवासाचा विचार करता श्रीलंका इलेव्हन संघाने आपला पहिला डाव 8 गड्यांच्या मोबदल्यात 363 धावांवर घोषित केला. निशान मदुशंका आणि रविंदू रसंथा यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची चांगली भागीदारी करत संघाचा पाया मजबूत केला. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला यशस्वी जयसवाल दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला आणि टीम इंडियाला पहिल्याच षटकात मोठा हादरा बसला. मात्र, केएल राहुल (40), देवदत्त पडिक्कलने (103) आणि रविंद्र जडेजा (63) यांनी मधली फळी सावरल्यामुळे 200 पार धावसंख्या नेली आहे.

ऋषभ पंत (2), ध्रुव जुरेल (1) स्वस्तात बाद झाले. मात्र, मानव सुथारने संघाची सुत्र आपल्या हाती घेत नाबाद 41 धावांवर फलंदाजी करत आहे. 71.5 षटकांचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली होती. टीम इंडिया अजूनही श्रीलंकेपासून 107 धावा पिछाडीवर आहे.