
इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळय़ातील तब्बल एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. इंदापूर तालुक्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती
या निर्णयामुळे इंदापूर, बारामती व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळणार असून, हजारो युवकांना रोजगाराच्या संधी, स्थानिक उद्योजकतेला चालना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे. औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक निर्णायक टप्पा गाठला असून, इंदापूर लवकरच नव्या उद्योगांचा केंद्रबिंदू म्हणून उभे राहणार असल्याचे चित्र आहे.

























































