भाजपकडून 50 आमदारांची गळचेपी होतेय, बच्चू कडू यांचा भाजपला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या आमदारांसोबत गुवाहटीला गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे अद्याप मंत्रीपदासाठी वेटिंग लिंस्टवरच आहे. मंत्रीमंडळ विस्तार होईल अशा आशेवर असलेल्या बच्चू कडू यांचा अखेर संयमाचा बांध तुटला असून त्यांनी त्यावरून मिंधे सरकारला घरचा आहेर दिला आहे. ”मंत्री मंडळ विस्तार करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही’, असं बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपकडून कशाप्रकारे 50 आमदारांची गळचेपी केली जात आहे असा धक्कादायक गौप्यस्फोटही त्यांनी केला.

”भाजपला 50 आमदारांच्या योगदानाचा विसर पडत असल्याचे आम्हाला जाणवत आहे. त्यांच्याकडून 50 आमदारांची गळचेपी होत आहे. भाजप आमदार व मंत्र्यांकडूनही त्रास दिला जात आहे. आमची कामं थांबवली जात आहेत. असं झालं नाही पाहिजे. रवी राणांनी माझ्यावर खोके घेतल्याचा आरोप केला”, अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

”मंत्रीमंडळ विस्ताराला एक वर्ष लागेल असं कधी वाटलं नव्हतं. पण अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही हे दुर्दैवी आहे. पण आता मंत्रीमंडळ विस्तार 2024 नंतरच होणार असं मी नेहमी सांगत होतो. ती क्षमता या सरकारमध्येच नाही. पण कामं चांगली झाल्याने मी नाराज नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.