WTC Final – टीम इंडियाच्या अंतिम 11 ची घोषणा, जाणून घ्या कुणाला मिळाली संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात उद्या 18 जून पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या अंतिम लढतीसाठी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने प्लेयिंग 11 ची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी 6 फलंदाज व 5 गोलंदाजांसह टीम इंडिया उतरणार आहे.

WTC Final – ‘हिटमॅन’ सावधान! फायनलपूर्वी लक्ष्मणचा रोहितला ‘VVS’ सल्ला

इंग्लंडमध्ये होणारा या सामन्यात टीम इंडियाकडून तीन जलदगती गोलंदाज व दोन स्पिनरला संधी देण्यात आली आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा व अश्वीन यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असणार आहे. रोहीत शर्मा व शुभमन गिल सलामीला येणार असून तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा उतरणार आहे. चौथ्यावर कोहली व त्यानंतर अजिंक्य रहाणे व ऋषभ पंत असा क्रम आहे.

WTC Final India vs New Zealand – महामुकाबल्यात कोण जिंकणार? ग्रहताऱ्यांच्या माध्यमातून मांडले भाकीत

टीम इंडिया

शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी