वानखेडेवरील सामन्यातही ‘सीएए’विरोधात निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुध्द (सीएए) समाजाच्या विविध स्तरांतून विरोधाचा सूर कायम आहे. वानखेडे मैदानावरील क्रिकेट सामन्यादरम्यानही ते पहायला मिळाले. अनेक तरुण-तरुणींनी ‘नोसीएए’, ‘नोएनआरसी’ आणि ‘नोएनपीआर’ असे प्रिन्ट केलेली टी-शर्ट परिधान करून आपला निषेध नोंदवला.

वानखेडेवर आज हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया पहिला वन-डे सामना होता. हा सामना पाहण्यासाठी मुंबईतील तरुणाईची संख्या अधिक होती. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींनी सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याविरुध्द घोषणाही दिल्या. मैदानावरील सर्वांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. अनेकांनी या तरुणांना मोबाईल फोनमध्ये क्लिक केले आणि सोशल मिडीयावर व्हायरल केले.