हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : फिरकीच ठरवणार मालिकेची दिशा

येत्या गुरुवारपासून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. यादरम्यान सलामीची कसोटी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. याच मालिकेसाठी सध्या दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. येत्या गुरुवारपासून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.त्यामुळे फिरकीचे वारेच मालिकेच्या विजयाची दिशा निश्चित करताना दिसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण, गत दहा वर्षांमध्ये हिंदुस्थानी मैदानावर फिरकीच्या गोलंदाजांना आपले वर्चस्व गाजवता आले. त्यांनी आपल्या सर्वोत्तम  गोलंदाजीतून प्रतिस्पर्धी संघांच्या अव्वल फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. त्यामुळे फिरकीपटूंनी सर्वाधिक ६५ टक्के विकेट हिंदुस्थानच्या  मैदानावर घेतल्या आहेत. यादरम्यान वेगवान गोलंदाज हिंदुस्थानातील खेळपट्टीवर सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांच्या नावे फक्त ३४ टक्के बळींची नोंद आहे. फिरकीपटूंच्या कामगिरीचा उंचावलेला आलेख पाहूनच सध्या ऑस्ट्रेलिया संघाने मोठ्ठा  धसका घेतला आहे.

फिरकीपटूंचे डावामध्ये ४८ वेळा ५+ बळी हिंदुस्थानामध्ये सर्वाधिक ४८ वेळा फिरकीपटूंनी डावात ५ पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. यातवेगवान गोलंदाज पिछाडीवर आहेत. वेगवान गोलंदाजांना १४ वेळाच हे यश संपादन करता आले. गत २०१३ पासून ६५ टक्के बळी हे फिरकीपटूंनी हिंदुस्थानातील मैदानावर घेतले आहेत. त्यामुळेच कमी धावांत झटपट बळी घेण्यात याठिकाणी फिरकीपटू अधिक तरबेज ठरलेले आहेत.

फिरकीपटूनी  ११ वेळा डावात सर्वच १० बळी घेतल्याची कामगिरी केली. वेगवान गोलंदाज यांच्या नावे फक्त एकदाच नाेंद {२०२१ मध्ये वानखेडेवर न्यूझीलंडच्या एकट्या एजाजने यजमान भारताचा डावात धुव्वा उडवला. त्याने १० बळी घेतले.

अश्विन-जडेजाच्या गत १० वर्षांत ४००+ विकेट आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा घरच्या मैदानावर गत दशकापासून आपले निर्विवाद वर्चस्व गाजवत आहेत. त्यामुळेच भारताची ही जोडी दौऱ्यावर आलेल्या प्रत्येक विदेशी संघासाठी किलर ठरली आहे. या दोघांनी आपला दबदबा कायम ठेवताना गत दहा वर्षांत ४०० पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. यात अश्विनच्या नावे २५८ आणि जडेजाच्या नावे १६९ विकेटची नोंद आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत हे दोघेच top-२ मध्ये आहेत. त्यानंतर वेगवान गोलंदाज उमेश यादवला तिसरे स्थान गाठता आले. त्याच्या नावे फक्त ८० विकेटची नोंद आहे.