
ऑस्ट्रेलिया व टीम इंडियामध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिकाही जिंकली आहे. शिखर धवन व विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना जिंकला.
India beat Australia by six wickets in second T20 International in Sydney to take unassailable 2-0 lead in three-match series
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2020
नाणेफेक टीम इंडियाने जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फंलदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. कर्णधार मॅथ्यू वेड याने केलेल्या 58 धावा व स्टीव्हन स्मिथच्या 46 धावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाने 195 धावांचा डोंगर रचला. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. शिखर धवनने 52 धावा, विराट कोहलीच्या 40 व हार्दीक पांड्याच्या 42 धावांच्या आधारे टीम इंडियाने 195 धावांचे लक्ष्य पार केले.




























































