IndVsWi – चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय, मालिकाही 2-0 ने जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया व वेस्ट इंडिजमध्ये झालेला दुसरा टी-20 सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. मात्र अखेर टीम इंडियाचा आठ धावांनी विजय झाला. या विजयासह टीम इंडियाने टी-20 मालिकाही खिशात टाकली.

नाणेफेक जिंकलेल्या वेस्ट इंडिजने सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजी दिली. टीम इंडियाच्या विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी दमदार फलंदाजी करत अर्धशतकं ठोकली व टीम इंडियाचा डाव 187 धावांपर्यंत नेला. या लक्ष्याचा पाठलाग करताना काईल मेयस आणि ब्रँडन किंग यांनी वेस्ट इंडीजला चांगली सुरुवात करून दिली. पूरनने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चार चेंडूत वेस्ट इंडीजला २३ धावांची आवश्यकता होती. पॉवेलने दोन षटकार खेचत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले होते. मात्र त्यानंतर सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला. वेस्ट इंडिजला 20 षटकात 178 धावा करता आल्या.