
1971 च्या युद्धात पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानी लष्करापुढे आत्मसमर्पण केले होते. हिंदुस्थानी लष्कराच्या गौरवशाली विजयाच्या निमित्ताने आजचा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. विजय दिनानिमित्त कोलकात्यात लष्करी पराक्रमाचे प्रदर्शन पाहायला मिळाले. लष्करी जवानांचा हेलिकॉप्टर शो, रोबोटिक डॉग शो, मार्च पास्ट, घोडय़ाची शर्यत असे वेगवेगळे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले.





























































