हिंदुस्थान-चीन चर्चा सुरूच, मंगळवारपासून चर्चेचे तीन राऊंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुर्व लडाखच्या गलवान खोऱयात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाल्यामुळे देशभरात चीनविरुद्ध तीव्र संताप आहे. दुसरीकडे दोन्ही देशांच्या लष्करी पातळीवर चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरूच आहे.

सोमवारी गलवान खोऱयात चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात आपले 20 जवान शहीद झाले. आपल्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देताना चीनचे 43 सैनिक ठार कले. या संघर्षानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही देशांच्या लष्कराच्या मेजर जनरल पातळीवर मंगळवारपासून चर्चेचे तीन राऊंड झाले आहेत.

चीन गप्पच
गलवान खोऱयात चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. मात्र, यावर चीन काहीही बोलत नाही. आजही पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. तसेच गलवान नदीवर चीनकडून धरण बांधले जात आहे का? हा प्रश्नही टाळला. काय खरे आणि काय खोटे याची चीनवर जबाबदारी नाही. आम्ही हिंदुस्थानला पूर्ण माहिती दिली आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.