
कोरोना महामारीच्या विरोधात लस हे प्रमुख अस्त्र ठरताना दिसत आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्र्ाज्ञांबरोबर हिंदुस्थानातील शास्त्र्ाज्ञांनीदेखील ‘कोरोना व्हॅक्सिन’च्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (Indian Institute of Science) मध्ये कोरोनाच्या कोणत्याही व्हेरीएंट्सवर अधिक प्रभावी ठरेल अशी लस तयार करण्याचे काम सुरू आहे.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’च्या मॉलिकुलर बायोप्सिस युनिटच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी अशा अणूंचा शोध लावला आहे जे कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. हे अणू न्यूट्रलाइजिंग ऑण्टिबॉडीज मोठय़ा प्रमाणात तयार करण्यासाठी सक्षम आहेत. देशात सध्या वापरण्यात येत असलेल्या लसींच्या तुलनेत त्याचा परिणाम अधिक असेल. कोरोनाच्या कोणत्याही व्हेरीएंट्सचे विषाणू संपवण्यास सक्षम असेल.
शास्त्र्ाज्ञांच्या मते ते तयार करत असलेल्या या लसीमध्ये सबयुनिट लस आहे. व्हायरसच्या सरफेसवर असलेल्या स्पाइक प्रोटीनची बाइंडिंग क्षमता रिसेप्टर आणि सेल्सवर सर्वाधिक असते. त्याला ‘रिसेप्टर बाइंडिंग डोमेन’ही म्हणतात. स्पाइक प्रोटीन 1700 अमिनो ऑसिड लांब असते. लसीमध्ये असलेला रिसेप्टर बाइंडिंग डोमेन याचा सूक्ष्dम अंश आहे. तो 200 अमिनो ऑसिड लांब आहे.
- नव्या लसीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदुस्थानातील वातावरणासाठी ती अनुकूल असेल. म्हणजे ही लस रूम टेंपरेचरवरदेखील साठवली जाऊ शकते.
- देशात आतापर्यंत अशा लसींचा वापर होतोय ज्या अत्यंत कमी तापमानात ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्या खराब होण्याचा धोका अधिक असतो. पण जर लसी रूम टेंपरेचरमध्ये ठेवता आल्या तर लसीकरण अधिक सोपे होऊ शकेल.
- शास्त्रज्ञांना लसीच्या फॉर्म्युल्यावर पूर्ण विश्वास आहे, पण लसीची क्लिनिकल डेव्हलपमेंट आणि ह्युमन ट्रायल होईपर्यंत सुमारे 9 ते 10 महिन्यांचा वेळ जाईल.
आयआयएसीच्या मॉलिकुलर बायोप्सिस युनिटच्या संशोधनात ज्या अणूंचा शोध लागला. हे अणू शरीरात मोठय़ा प्रमाणावर न्यूट्रलाइजिंग ऑण्टिबॉडीज तयार करतात. त्यामुळे ते व्हायरससाठी धोकादायक आहे. कोरोनाच्या कोणत्याही व्हेरीएंट्सचे विषाणू संपवण्यास ते सक्षम आहेत. – प्रो. राघवन वरदाराजन
आठ पट अधिक ऑण्टिबॉडीज तयार होतील
या फॉर्म्युल्याच्या चाचणीत कोविडमधून सावरलेल्या रुग्णांमध्ये मिळालेल्या ऑण्टिबॉडीजच्या तुलनेत आठ पट अधिक ऑण्टिबॉडीज मिळाल्या. शास्त्र्ाज्ञांच्या मते ऑण्टिबॉडीज अधिक असण्याचा फायदा असा असतो की, त्यांचे प्रमाण कमी झाले तरी आजारापासून वाचण्यासाठी शरीरात पुरेशी क्षमता असेल.




























































