Breaking – देशात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; काय सुरु राहणार, काय बंद जाणून घ्या

9248

देशात लॉकडाऊन 5.0 लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 1 जून ते 30 जून दरम्यान लागू होणार आहे. मात्र या दरम्यान धार्मिक स्थळे काही अटींसह उघडली जाणार आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. सरकारने याबाबत मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत. लॉकडाऊन -5 ला अनलॉक -1 असे नाव देण्यात आले आहे.

मुख्य गोष्टी –

  • लॉकडाऊन -5 ला अनलॉक -1 असे नाव देण्यात आले आहे.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंट 8 जूनपासून सुरू होतील.
  • 30 जूनपर्यंत रात्री कर्फ्यू सुरु राहणार.
  • 8 जूनपासून अटींसह धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी.
  • सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध कायम राहतील
  • 8 जूनपासून शॉपिंग मॉल्स सुरू होतील.
  • जुलैमध्ये सिनेमागृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
  • शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची बंदी कायम राहील. पान, गुटखा आणि दारू पिण्यास सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध कायम.
  • कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल.

आपली प्रतिक्रिया द्या