दिल्लीतील पाकिस्तानी अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश

नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला हिंदुस्थाननेपर्सेना नॉन ग्राटा घोषित केले असून त्याला 24 तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱयावर त्याच्या राजनैतिक पदाला न शोभणाऱया कृत्यांमध्ये सहभाग घेतल्याने त्याला हिंदुस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या उद्ध्वस्त हवाई तळाचे फोटो प्रसिद्ध

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानने पाकिस्तानी सैन्याचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. खासगी कंपनी मॅक्सारच्या उपग्रहाने या उद्ध्वस्त हवाई तळांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. सरगोधा, नूर खान, भोलारी आणि सुक्कुर या हवाई तळांचा यात समावेश आहे. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती हे फोटो कथन करत आहेत.