धक्कादायक! पाकिस्तानात हिंदुस्थानी राजनैतिक अधिकाऱ्यांचा होतोय छळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. पाकिस्तानमधील हिंदुस्थानच्या दुतावासातील अधिकाऱ्यांचा छळ होत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. हिंदुस्थान टाईम्स या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. याप्रकरणी हिंदुस्थानने पाकिस्तानकडे तक्रार केली आहे.

याआधी डिसेंबर महिन्यात देखील हिंदुस्थान राजनैतिक अधिकाऱ्यांचा पाकिस्तानात छळ होत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी काही अधिकाऱ्यांच्या घरातील गँस जोडणी कापण्यात आली आहे. तसेच अनेक अधिकाऱ्यांच्या इंटरनेट व वीज सुविधाही खंडित करण्यात आल्या होत्या. तसेच या अधिकाऱ्यांना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचा अपमान करून त्यांनाही त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राहणे अधिकाऱ्यांना कठीण झाले होते. याबाबत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून कठोर शब्दांत समजही दिली होती.