
देशाचा आर्थिक विकासाचा दर यावर्षी स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल, असे मत इन्फोसिसचे प्रमुख एन. आर. नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले आहे. कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विधानाचा आधार घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ असा टोला लगावला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. उद्योगधंदे बंद असल्याने उत्पादन घटले असून व्यवसाय, विक्रीवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या जीडीपीमध्येही स्कातंत्र्यानंतरची सर्कात मोठी घसरण दिसून येऊ शकते. हे लक्षात घेता अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर रुळावर आणणे गरजेचे असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील पोस्ट ट्विट करत राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नारायण मूर्ती काय म्हणाले?
- कोरोनामुळे जगभरातील व्यापार अडचणीत आला आहे.
- जागतिक जीडीपीमध्ये पाच ते दहा टक्के घट होऊ शकते.
- देशात 1947 नंतर सर्वात वाईट जीडीपी यावर्षी दिसू शकतो.
- जीडीपीमध्ये किमान पाच टक्के आकुंचन होण्याचा अंदाज आहे.
- ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम व्हावे.

























































