
हिंदुस्थानात फक्त फेसबुक किंवा व्हॉट्सऍपच नाही तर टेलिग्रामचीदेखील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. हळूहळू टेलिग्राम हे ऍप व्हॉट्सऍपला टक्कर देत असल्याचे चित्र आहे. नुकताच टेलिग्रामने एक अब्ज डाऊनलोड्सचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे टेलिग्रामचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 22 टक्के युजर्स हिंदुस्थानात आहेत. व्हॉट्सऍपने मध्यंतरी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या अनेक युजर्सने आपला मोर्चा टेलिग्रामकडे वळवला होता. टेलिग्रामदेखील आपल्या युजर्सचा चॅटिंगचा अनुभव अधिक मजेशीर करण्यासाठी सातत्याने नवनवीन फिचर्स आणत आहे, याचाही फायदा कंपनीला झाला आहे. हिंदुस्थाननंतर रशिया आणि इंडोनेशियात टेलिग्राम युजर्स सर्वाधिक आहेत.

























































