2021 च्या टी-20 ‘वर्ल्डकप’चे यजमानपद हिंदुस्थानला, आयसीसीची घोषणा

978

देशातील क्रीडा प्रेमींसाठी खुशखबर असून 2021 मध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप हिंदुस्थानमध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (आयसीसी) याबाबत शुक्रवारी घोषणा केली. तसेच 2022 मध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे.

शुक्रवारी आयसीसीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत आगामी दोन्ही टी-20 वर्ल्डकपच्या होस्टवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानुसार बीसीसीय 2021 चा वर्ल्डकप आणि 2022 चा वर्ल्डकप क्रिकेट ऑस्ट्रेलिया आयोजित करणार आहे.

याआधी 2021 चा वर्ल्डकप हिंदुस्थानमध्ये आयोजित करण्याचे बीसीसीआयने ठरवले होते. कारण 2022 च्या वर्ल्डकपनंतर एका वर्षाच्या आत एक दिवसीय वर्ल्डकप होणार आहे. 2023 चा एक दिवसीय वर्ल्डकप देखील हिंदुस्थानमध्ये होणार आहे. त्यामुळे एका वर्षाच्या आत दोन वर्ल्डकप आयोजित करणे सोपे नसल्याने बीसीसीआय 2021 च्या टी-20 वर्ल्डकपच्या आयोजनासाठी आग्रही होती.

आपली प्रतिक्रिया द्या