
देशातील बनावट सिमकार्ड वापराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने कडक पावले उचलली आहेत. सिमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी एआय शिल्डचा वापर केला जाईल. नव्या तंत्रज्ञानामुळे नकली कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड खरेदी करता येणार नाही. तसेच एआय शिल्ड युजर्सच्या सिमकार्डलाही सुरक्षित ठेवेल.
दूरसंचार विभागाने ‘एक्स’वर याची माहिती दिली. दूरसंचार विभागाने असा दावा केलाय की, एएसटीआर हे एक असे टुल आहे, जे आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या फेस रिकग्नेशनवर आधारित आहे. यामध्ये
युजरच्या फेशिअल व्हेरिफिकेशनच्या मदतीने
टेलिकॉम सबस्क्रायबर्सना व्हेरिफाय केले जाईल. वाढत्या सायबर गुह्यांना रोखण्यासाठी हा पर्याय प्रभावी ठरेल.
- जर कुणी खोटी कागदपत्रे देऊन नकली सिमकार्ड घेतले, तर एआय बेस्ड फेस रिकग्नेशन फीचर त्या कागदपत्रांना व्हेरिफाय करेल. कागदपत्रांची सतत्या पडताळणी झाली नाही, तर सिमकार्ड त्वरित ब्लॉक केले जाईल.
- अशा पद्धतीने सबस्क्रायबर्स डेटाबेसला नव्या टुलच्या आधारे तपासले जाईल. खोटय़ा कागदपत्राच्या आधारे सिमकार्डचा वापर केला जात असेल तर त्याला ब्लॉक केले जाईल.
- अलीकडच्या काही दिवसांत दूरसंचार विभागाने सायबर क्राईम करणारी 4.2 कोटी सिमकार्ड ब्लॉक केली आहेत. या नकली सिमकार्डचा वापर करून युजर्सला कॉल किंवा मेसेज करून फसवले जाते.