वसईत करोनाचा आणखी एक रुग्ण; एकूण संख्या 2

1372

वसईत शुक्रवारी आणखी एक करोना बाधित रुग्ण आढळून आला असून त्याच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहे. लागण झालेला तरुण रविवारी दुबईहून वसईत आला होता. यामुळे वसईत सापडलेल्या करोना बाधीत रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे.

 काही दिवसांपूर्वी वसई पुर्वेच्या एका इमारतीतून एक करोना बाधीत रुग्ण आढळला होता. त्याच परिसरातून आणखी एका तरुणाला करोना विषाणूची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. रविवार 22 मार्च रोजी हा तरुण दुबईला आला होता. त्यानंतर त्याने आपल्या इमारतीत स्वत:ला अलगीकरण करून घेतले होते. मात्र त्याला त्रास जाणवू लागल्याने तो खाजगी टॅक्सीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा तपासणी अहवाल शुक्रवारी आला आणि त्याला करोनाची संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

 पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याच्या कुटुंबातील तिनही सदस्यांना अलगीकरण कक्षात ठेवले असून तो ज्या टॅक्सीने गेला त्या टॅक्सीचालकाचा तसेच हा तरुण ज्यांच्या संपर्कात आला त्यांचा शोध सुरू असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या