कोरोना रुग्णसंख्या घटतेय, गेल्या 24 तासांत आढळले साडे तीन लाखहून अधिक रुग्ण

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी चार लाखाच्या घरात रुग्ण आढळत होते आता त्यात घट होताना दिसत आहे. तसेच तीन लाखहून अधिक रुग्ण दररोज बरे होत आहे. असे असले अरी रुग्णांची मृत्यूसंख्या लक्षणीय आहे.

गेल्या 24 तासांत देशांत 3 लाख 57 हजार 229 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 कोटी 2 लाख 82 हजार 833 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 3 लाख 20 हजार 289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 3 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 2 लख 22 हजार 408 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 34 लाख 47 हजार 133 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 कोरोनाच्या लस देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या