हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने उचललं मोठं पाऊल, नवे नियम केले अधिसूचित

Centre Takes Big Step Amidst India-Pakistan Tensions, New Rules Notified

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने आंतर-सेवा संघटना (ISO) चे प्रभावी कमांड, नियंत्रण आणि कौशल्यपूर्ण कामकाजास अधिक मजबूत करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांमध्ये एकत्रित कमांडसाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 27 मे पासून लागू होणारे हे नियम लागू केले आहेत.

हे नियम आंतर-सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा 2023 अंतर्गत अधिसूचित केले गेले आहेत ज्यामुळे सशस्त्र दलांमध्ये अधिक संयुक्तता आणि कमांड कार्यक्षमता सक्षम होईल.

‘या महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्यानंतर आंतर-सेवा संघटना (ISO) चे प्रभावी कमांड, नियंत्रण आणि कौशल्यपूर्ण कामकाज अधिक मजबूत होईल, ज्यामुळे सशस्त्र दलांमध्ये अभेद्य संयुक्तता पाहायला मिळेल’, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

2023 च्या पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केले. 15 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि 8 मे 2024 च्या राजपत्र अधिसूचनेनुसार, हा कायदा 10 मे 2024 पासून लागू झाला.

Centre Takes Big Step Amidst India-Pakistan Tensions New Rules Notified