टाटा इस्पितळाला धमकीचा ई-मेल

 

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती असून त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरलेले असताना आज सकाळी परळ येथील टाटा मेमोरियल इस्पितळात धमकीचा ई-मेल धडकला. इस्पितळ इमारतीत बॉम्ब ठेवला असल्याचे त्या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले होते.

संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण आहे. त्यात टाटा इस्पितळात धमकीचा ई-मेल पाठवून अज्ञाताने खोडसाळपणा केला. आज सकाळच्या सुमारास टाटा इस्पितळाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक धमकीचा ई-मेल धडकला. इस्पितळात बॉम्ब ठेवण्यात आला असून रुग्णांचा बचाव करावा लागेल असे त्या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात तपासणी केली, परंतु संशयास्पद काहीच आढळून आले नाही.