हिंदुस्थानातील दारिद्रय़रेषा घटली, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

हिंदुस्थानात गेल्या दहा वर्षांत दारिद्रय़रेषेखालील राहणाऱ्या लोकसंख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार 2005-06 आणि 2015-16 दरम्यान हिंदुस्थानात तब्बल 273 दशलक्ष नागरिक हे दारिद्रय़रेषेबाहेर आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घट असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रविकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड दारिद्रय़ आणि मानव विकास पुढाकार यांनी हा बहुआयामी निर्देशांक नुकताच जारी केला असून 2000 ते 2019 दरम्यान बहुआयामी दारिद्रय़ामध्ये 75 पैकी 65 देशांमध्ये घट झाल्याचे सांगितले आहे.

बहुआयामी दारिद्रय़ हे गरीब लोकांच्या रोजच्या आयुष्यातील त्यांचे विविध अनुभव, त्यांचे आरोग्य, शिक्षणाचा अभाव, त्यांची राहण्याची स्थिती, कामाचा दर्जा, हिंसा आणि वातावरणातील त्यांचे राहणीमान या सगळ्यातून निष्कर्ष काढून ठरविले जाते. 65 देशांमध्ये दारिद्रय़रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या घटली असून त्याचे बहुआयामी दारिद्रय़ निर्देशांक मूल्य हे 50 वर आले असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या