
हिंदुस्थानने कोरोना महामारीच्या काळात आपला शेजारधर्म पाळला आहे. हिंदुस्थानने म्यानमारला कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसीवीर औषधांचे 3 हजार डोस पाठवले आहेत. ही इंजेक्शन हिंदुस्थानी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंखला यांनी म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांच्याकडे सोपवली.
लष्करप्रमुख आणि परराष्ट्र सचिव दोन दिवसांच्या म्यानमार दौऱयासाठी रविवारी नेपिता येथे पोहोचले आहेत. आपला कार्यभार सांभाळल्यानंतर लष्करप्रमुख नरवणे यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. चीनसोबतच्या तणावाच्या वातावरणात हिंदुस्थानी शिष्टमंडळाच्या या दौऱयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



























































