राफेलची पहिली तुकडी जुलैमध्ये हिंदुस्थानात

युद्धात प्रभावशाली ठरणाऱ्या राफेल फायटर विमानाची एक तुकडी येत्या 27 जुलैपर्यंत हिंदुस्थानात दाखल होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हरियाणाच्या अंबाला एअर बेसवर ही तुकडी तैनात होणार असून साधारणपणे चार ते सहा विमाने यावेळी हिंदुस्थानात दाखल होणार आहेत. तर दुसरी तुकडी ऑगस्टमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चीन आणि पाकिस्तानकडे राफेल विमाने नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या