… म्हणून सैन्याने ‘Operation Sindoor’ नाव दिलं; वाचा महत्त्वाचं कारण

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण हिंदुस्थान हादरला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सामान्य हिंदू नागरिकांना अधिक लक्ष्य केले. महिलांचे सिंदूर, त्यांच्या सौभाग्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे केवळ निष्पाप लोकांना मारण्याचा हेतू नसून हिंदुस्थानी संस्कृती आणि कुटुंबावर भ्याड हल्ला करणे हा त्यांचा हेतू होता. या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर म्हणून, हिंदुस्थानी सैन्याने एक मोहीम सुरू केली. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले.

Operation Sindoor हेच नाव का दिले?

दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 25 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी बैसरनमधील पर्यटकांना लक्ष्य केले, परंतू त्यांनी कोणत्याही महिलेवर हल्ला केला नाही. दहशतवाद्यांनी विशेषतः विवाहित महिलांच्या पतींना त्यांच्यासमोरच धर्म विचारून गोळ्या झाडल्या होत्या. या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. यावर आता हिंदुस्थानने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून त्यांची बोतली बंद केली आहे.

दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी महिलांच्या सौभाग्यावर आणि हिंदू संस्कृतीवर हल्ला केला, म्हणून या कारवाईला ओपरेशन सिंदूर हे नाव दिले आहे. आणि हल्ल्याच्या 16 व्या दिवशी, हिंदुस्थानने Operation Sindoor च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत. या हवाई दलाच्या हल्ल्यात 4 जैश-ए-मोहम्मद, 3 लष्कर-ए-तैयबा आणि 2 हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी अड्ड्यांचा खातमा करण्यात आला.

Operation Sindoor नंतर संपूर्ण हिंदुस्थानातून उत्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. संपूर्ण सोशल मीडियावर जय हिंदचा जयघोष केला जात आहे. पाकिस्तानविरोधात ही आपली पहिलीच कारवाई असून ती यशस्वी झाल्यामुळे देशभातून हिंदूस्थानी सैन्याचे कौतुक होत आहे. अनेक नेत्यांनी देखील ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.